घाटावरचा माळ....
नाही नदी , नाही नाला माळ आमचा कोरडा , कधी काळी म्हणे इथे वाहत होता ओढा ... किती हा उकाडा अन उन्हाच्या झळा , पिढ्यानपिढ्या आम्ही सोसल्या दुष्काळाच्या कळा ... बोडका डोंगर अन बोडकीच दरी , असली जरी ओसाड , हीच आमची पंढरी ... आत्महत्या नाही केली , नाही सोडली जिगर , मनगटावर विश्वास आमचा , फोडला मग डोंगर ... भरून टाकली माती अन ओढून आणला गाळ , जिद्द आमची बघून मग ओशाळला दुष्काळ ... माळ आमचा सुखावला बघून ही नवलाई , कोरड्या माळावर बहरली बघा कशी आमराई ... पिढ्यानपिढ्या दुष्काळाने झालो जरी घायाळ , प्रिय असे आम्हास आमचा घाटावरचा माळ ... 🌹🌹सचिन कुंभार 🌹🌹