Posts

Showing posts from September, 2021

चला गड्यांनो घ्या शपथ

झाली प्रियांका, झाली निर्भया, आता कुणाचं येईल नाव.... रोजच होतात इथे अत्याचार, आता कुठपर्यंत रडायचं राव... आंदोलन आणि मेणबत्ती मार्च, कितीदा वाहणार आदरांजली.... सहन तरी किती ते करावे आम्ही, कितीदा पाहाव्या जळणाऱ्या मुली?... मुलींनो आता पेटून उठा, विकृत मनोवृत्ती छाटून टाका... किळसवाणा स्पर्श करणारा हात, आता मुळासकट उखडून टाका... गरज शिवबाच्या पुनर्जन्माची, शिवबाच्या सुसंस्कृत विचारांची ... गरज महाराष्ट्राला जिजाऊची, जिजाऊच्या तडफदार लेकींची... चला तर उठा, गड्यांनो घ्या शपथ, आता आणखी सहन करणार नाही.... आया बहिणींवर वाईट नजर ठेवणाऱ्यांचे मुडदे पाडल्याशिवाय राहणार नाही... 🌹🌹सचिन कुंभार 🌹🌹

पहिल्या प्रेमाचा साक्षीदार....

आपल्या प्रेमाचा साक्षीदार , आता पहिल्यासारखा बहरत नाही ... लोक म्हणतात त्याच वय झालंय , आता त्याला सुधरत नाही ... हा तोच दारातला गुलमोहर , आता थोडा झुकला आहे ... कमी पाण्याने नाही वेडे , तुझ्या न येण्याने सुकला आहे ... गळालीत त्याची सारी फुले , कळ्याही आता रुसल्या आहेत ... शेंड्यावरच्या कोवळ्या पालवीनेही , हळव्या आठवणी पुसल्या आहेत ... लाल केशरी फुलांची जागा , पालिकेच्या कुंडीत होती ... तरीसुद्धा वेडी सावली त्याची , तुलाच प्रिये धुंडीत होती ... ❤️❤सचिन कुंभार ️❤️❤️

रोम रोम हर्षला....

 शिर्षक : रोम रोम हर्षला... आज पुन्हा मी पाहिला , खिडकीतून गुलमोहर फुललेला ... तिच्या माझ्या प्रीतीचा , सोहळा आत रंगलेला ... प्रीतीचा हा बहर पाहून , पाऊस ही रोमांचला ... भेटाया धरतीला आज , तो खूप खूप तरसला ... रंगात आमच्या प्रेमाच्या , तो मनसोक्त रंगला ... व्याकुळ धरतीच्या आठवणींनी , मग पुन्हा पुन्हा बरसला ... ओल्या मातीचा सुगंध , तनामनात दरवळला ... पावसाच्या गार स्पर्शाने , रोम रोम हर्षला ... निसर्गाचा अविष्कार पाहून , कवीही मग सरसावला ... शब्दांच्या पावसात त्याने , सारा आसमंत भिजवला ... 🌹🌹सचिन कुंभार 🌹🌹