रोम रोम हर्षला....

 शिर्षक : रोम रोम हर्षला...


आज पुन्हा मी पाहिला ,

खिडकीतून गुलमोहर फुललेला ...

तिच्या माझ्या प्रीतीचा ,

सोहळा आत रंगलेला ...


प्रीतीचा हा बहर पाहून ,

पाऊस ही रोमांचला ...

भेटाया धरतीला आज ,

तो खूप खूप तरसला ...


रंगात आमच्या प्रेमाच्या ,

तो मनसोक्त रंगला ...

व्याकुळ धरतीच्या आठवणींनी ,

मग पुन्हा पुन्हा बरसला ...


ओल्या मातीचा सुगंध ,

तनामनात दरवळला ...

पावसाच्या गार स्पर्शाने ,

रोम रोम हर्षला ...


निसर्गाचा अविष्कार पाहून ,

कवीही मग सरसावला ...

शब्दांच्या पावसात त्याने ,

सारा आसमंत भिजवला ...


🌹🌹सचिन कुंभार 🌹🌹

Comments

Post a Comment