पहिल्या प्रेमाचा साक्षीदार....

आपल्या प्रेमाचा साक्षीदार ,
आता पहिल्यासारखा बहरत नाही ...
लोक म्हणतात त्याच वय झालंय ,
आता त्याला सुधरत नाही ...

हा तोच दारातला गुलमोहर ,
आता थोडा झुकला आहे ...
कमी पाण्याने नाही वेडे ,
तुझ्या न येण्याने सुकला आहे ...

गळालीत त्याची सारी फुले ,
कळ्याही आता रुसल्या आहेत ...
शेंड्यावरच्या कोवळ्या पालवीनेही ,
हळव्या आठवणी पुसल्या आहेत ...

लाल केशरी फुलांची जागा ,
पालिकेच्या कुंडीत होती ...
तरीसुद्धा वेडी सावली त्याची ,
तुलाच प्रिये धुंडीत होती ...

❤️❤सचिन कुंभार ️❤️❤️

Comments

Post a Comment