चला गड्यांनो घ्या शपथ
झाली प्रियांका, झाली निर्भया,
आता कुणाचं येईल नाव....
रोजच होतात इथे अत्याचार,
आता कुठपर्यंत रडायचं राव...
आंदोलन आणि मेणबत्ती मार्च,
कितीदा वाहणार आदरांजली....
सहन तरी किती ते करावे आम्ही,
कितीदा पाहाव्या जळणाऱ्या मुली?...
मुलींनो आता पेटून उठा,
विकृत मनोवृत्ती छाटून टाका...
किळसवाणा स्पर्श करणारा हात,
आता मुळासकट उखडून टाका...
गरज शिवबाच्या पुनर्जन्माची,
शिवबाच्या सुसंस्कृत विचारांची ...
गरज महाराष्ट्राला जिजाऊची,
जिजाऊच्या तडफदार लेकींची...
चला तर उठा, गड्यांनो घ्या शपथ,
आता आणखी सहन करणार नाही....
आया बहिणींवर वाईट नजर ठेवणाऱ्यांचे
मुडदे पाडल्याशिवाय राहणार नाही...
🌹🌹सचिन कुंभार 🌹🌹
विदारक सत्य
ReplyDeleteधन्यवाद 🙏🙏
Deleteखुप खुप सुंदर सर...
ReplyDelete🌹🌹🌹🌹🌹🌹
प्रेम कवी देवेंद्र🙏
अप्रतिम काव्य....
ReplyDeleteवास्तवदर्शी।👌
ReplyDeleteलिहित रहा सातत्य यातच blogger चे यश सामावलेले असते.. !!
ReplyDeleteअपेक्षा तुमच्या लिखाणाची..🌹
आबा 🙏