घाटावरचा माळ....
नाही नदी , नाही नाला माळ आमचा कोरडा ,
कधी काळी म्हणे इथे वाहत होता ओढा ...
किती हा उकाडा अन उन्हाच्या झळा ,
पिढ्यानपिढ्या आम्ही सोसल्या दुष्काळाच्या कळा ...
बोडका डोंगर अन बोडकीच दरी ,
असली जरी ओसाड , हीच आमची पंढरी ...
आत्महत्या नाही केली , नाही सोडली जिगर ,
मनगटावर विश्वास आमचा , फोडला मग डोंगर ...
भरून टाकली माती अन ओढून आणला गाळ ,
जिद्द आमची बघून मग ओशाळला दुष्काळ ...
माळ आमचा सुखावला बघून ही नवलाई ,
कोरड्या माळावर बहरली बघा कशी आमराई ...
पिढ्यानपिढ्या दुष्काळाने झालो जरी घायाळ ,
प्रिय असे आम्हास आमचा घाटावरचा माळ ...
🌹🌹सचिन कुंभार 🌹🌹
Vva khup chan lihilay apratim rachna keli 👌👌👌
ReplyDeleteव्वा...खूप खूप सुंदर लिहिलंय..अप्रतिमच👌👌👌
ReplyDeleteवा, अतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना केली!✍️👌👌
ReplyDelete